banner 728x250

‘जर तर ची गोष्ट’ चा दणक्यात शुभारंभ ; पहिल्याच प्रयोगाला झळकली ‘हाऊसफुल्ल’ची पाटी

banner 120x600
banner 468x60

banner 325x300

सुमारे एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ म्हणजेच प्रिया बापट आणि उमेश कामत रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवर पाहायलाही आवडते. हीच सुंदर केमिस्ट्री नाट्यरसिकांना आता नाट्यगृहात पाहायला मिळणार आहे. सोनल प्रॅाडक्शन्स निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा नुकताच शुभारंभ झाला असून पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत.

शुभारंभाच्या प्रयोगाविषयी निर्माते नंदू कदम म्हणतात, ‘’ॲानलाईन, ॲाफलाईन तिकीटविक्री सुरू झाल्यापासूनच नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पार पडल्यामुळे खूप आनंद आहे. मला खात्री आहे, हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. तिकीट न मिळाल्याने काही प्रेक्षक नाराजही झाले आहेत, मात्र त्यांच्यासाठी आम्ही लवकरच आणखी प्रयोग सादर करू. सर्व वयोगटाला आवडेल, असे हे कौटुंबिक नाटक आहे.’’

banner 325x300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *